खराडी परिसरामध्ये पॉपी स्ट्रा (अफु) या अंमली पदार्थाची विक्री करणारा इसम जेरबंद..!

दिनांक ०६/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व पोलीस अंमलदार असे पुणे शहर हद्दीत अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना खराडकर पार्क, थिटे वस्ती, साईकृपा बिल्डींगसमोर रस्त्याच्या कडेला, खराडी, पुणे येथे एक इसम हा दोन गोण्यासह संशयीतरित्या उभा असल्याचे मपोहवा सुर्यवंशी यांना दिसुन आले. नमुद इसमास ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता, तो असमाधानकारक व उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याच्या ताब्यात काहीतरी अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने सदर इसमाची झडती घेतली असता आरोपी नामे मुकेश बिश्णोई वय ३० वर्षे रा. खराडकर पार्क, थिटे वस्ती खराडी, पुणे याचे ताब्यातील गोण्यामध्ये एकुण ०२,६१,६००/-रु. किं. चा १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रा (अफु) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र. नं १९७/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

एकुण हस्तगत मुद्देमाल

एकुण कि रु ०२,६१,६००/- चा १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रा (अफु)

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. गौहर हसन, मा. सहा.पो.आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुखे, विशाल भिलारे, निशिकांत सावंत, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षिरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, आशा भिंगारे, जान्हवी सुर्यवंशी व मंगेश गुंड यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page