घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळीस केले जेरबंद ०८ घरफोडीचे व ०१ वाहनचोरीचा गुन्हा उघड करून लाखोंचा मुद्देमाल केला जप्त..!

मा. वरिष्ठांचे आदेशाने कोथरूड पोलीस स्टेशन गु.र.नं. २२८/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१ (३),३ (५) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक ०१, हे समांतर तपास करीत असताना पुणे शहर व पिंपरी परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून व तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करण्यात आले.
दिनांक ३०/०६/२०२६ रोजी दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार साई कारके व महेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचेकडून दाखल गुन्ह्यातील आरोपी हे पुणे येथून गोव्याला जाणार असून सध्या ते रेंजहिल्स, खडकी परीसरात थांबले असल्याची खात्रिशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी यशस्वी सापळा कारवाई रचून सदर आरोपींना शिताफिने ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) धनंजय हरीष काळे वय २१ वर्षे, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव, पिंपरी, पुणे २) यश उर्फ गट्या दत्ता देशमुख वय १९ वर्षे, रा. आदर्श हॉटेलजवळ, भारतनगर, पिंपरी ३) विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी कोथरूड परीसरात वरील प्रमाणे घरफोडी चोरी केल्याचे कबुली देवून चोरी केलेला मुद्देमाल इसम नामे मोहन नागनाथ नवले, वय ३९ वर्षे, रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी रेल्वे स्टेशनचे शेजारी, पिंपरी, पुणे व त्याचा साथीदार यांचे मार्फतीने विक्री केले बाबत माहिती दिल्याने इसम नामे मोहन नागनाथ नवले यास ताब्यात घेण्यात आले असून आरोपी व रिसीव्हर मोहन नवले यांचेकडून एकूण ११,११,०००/-रु.कि.चा मुद्देमाल (रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल व सोन्याचे दागिने) जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीकडे सखोल तपास केला असता त्यांनी १) कोथरूड पोलीस स्टेशन येथे ०२ २) बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे ०१ ३) सहकारनगर पोलीस स्टेशन येथे ०१ ४) दिघी पोलीस स्टेशन येथे ०१ ५) संजयनगर पोलीस स्टेशन (सांगली) येथे ०३ ६) वापी पोलीस स्टेशन (वलसाड जिल्हा गुजरात) येथे ०१ गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
नमूद आरोपी व विधीसंर्षित बालक तसेच जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कोथरूड पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ मा. श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ मारुती खेडकर यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी. नाथा भुजबळ (एम.ओ.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर), पोलीस उप-निरी. जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार साई कारके, महेश पाटील साधना पवार, अमित गद्रे, बाळु गायकवाड, रविंद्र लोंखडे, अजित शिंदे, प्रदिप राठोड, गणेश ढगे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे.




