जबरी चोरी करणा-या सराईत आरोपीस शिताफीने पकडुन त्याचेकडुन चोरीचे १,३०,०००/-रु. किं. चे ४ मोबाईल फोन केले हस्तगत..!

दिनांक २४/०५/२०२६ रोजी २०/३५ वा. चे सुमारास कात्रज कोंढवा रोडवर, माऊलीनगर बस स्टॉपजवळ, कात्रज पुणे येथुन यातील फिर्यादी हे दुध आणण्यासाठी पायी जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवुन लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरुन नेला आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३१७/२०२६ भा.न्या.सं.क. ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर हे मोबाईल चोरांचा तांत्रिक विश्लेषण व बातमीदारा मार्फतीने शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राहुल निकम व त्याचे दोन साथीदार यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नमुद आरोपींचा शोध घेत असताना त्यातील आरोपी राहुल सिताराम निकम, वय २८ वर्षे, रा. लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महंमदवाडी, कोंढवा, पुणे हा वंडरसिटी रोडवर थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्याप्रमाणे नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरी केलेले १,३०,०००/-रु.किं. चे ४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडग यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page