पुण्यात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे – पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता बोपदेव घाटातून खडीमशिन रस्त्यावर भरधाव दुचाकीस्लीप होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. गणेश रमेश राठोड (वय २७, रा. केशवनगर, मुंढवा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अक्षय अर्जुन मोरे (वय २७) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय आणि गणेश मित्र आहेत. दोघे मोपेड दुचाकीने दोन दिवसांपुर्वी सायंकाळी बोपदेव घाट रस्त्याने खडीमशिन रस्त्याने जात होते. अक्षय दुचाकी चालवत होता. तेव्हा भरधाव दुचाकीवरील नियत्रंण सुटले आणि अक्षयकडून दुचाकीस्लीप झाली. दुचाकी स्लीप झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना गंभीर मार लागल्याने गणेश याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




