गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळुन, देशी बनावटीचे ०१ पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे केले जप्त..!

दिनांक २५/०६/२०२६ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक नाकाबंदी करीत असताना १७/०० वा. चे सुमारास एक पांढरे रंगाची ग्लांझा कार ब्लॅक फिल्मींग असलेली वाघोलीकडुन नगरच्या दिशेने येत असताना दिसुन आल्याने पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सुधीर शिवले व पोलीस अंमलदार मल्हारी सपुरे यांनी सदर कारला रोडचे बाजुला घेण्याचा इशारा केला असता सदरची कार ही वेगाने निघुन जावु लागल्याने नाकाबंदी करीता असणारे इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मदतीने सदरची कार थांबविली. त्यावेळी पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सुधीर शिवले व मल्हारी सपुरे कारची तपासणी केली असता सदर कारमध्ये मोक्का व खुनाच्या गुन्हयातील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे १) रोहन ऋषिकेश गायकवाड, वय २२ वर्षे, रा. मु.पो. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे २) अभिषेक भानुदास लंघे, वय २५ वर्षे, रा. मु.पो. करडे, ता. शिरूर जि. पुणे ३) विशाल उध्दव झोडगे, वय २२ वर्षे, रा, मु.पो. कासारी, ता. शिरूर जि. पुणे मिळुन आले.

Advertisement

सदरवेळी नमुद आरोपी इसमांची व कारची झडती घेतली असता सदर कारमध्ये ३०,०००/- रु. किंमतीचे ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ६,०००/- रु. किंमतीचे ०३ जिवंत काडतुस व ६,००,०००/-रु. किंमतीची ग्लांझा कार असा एकुण ६,३६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदरबाबत नमुद आरोपीविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. २७०/२०२६ आर्म अॅक्ट क. ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरी. गजानन कागणे, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ७, पुणे शहर डॉ. प्रशांत अमृतकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती स्वाती खेडकर, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरी. गजानन कागणे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सागर जगताप, संतोष अंदुरे, दिपक ठाणगे, रितेश काळे, शुभम चिनके, मल्हारी सुपरे, सुधीर शिवले, दिनेश मरकड, सागर वाळके, अजित कारकुड व प्रविण खोसे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page