सराईत गुन्हेगारांकडुन १,२१,००० /- रु. किमतीचे ३ पिस्टल व ५ काडतुसे केले जप्त..!

दिनांक १६/०६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तसेच पोलीस अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्वल मोकाशी यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, वडगाव पठार सिंहगड पुणे येथे दोन संशयित इसम अग्निशस्त्रे जवळ बाळगुन थांबले आहेत. सदरची बातमी युनिटचे पोलीस निरीक्षक प्रभारी श्री अजित जाधव यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने युनिट २ पथकाने सिंहगड आंबेगाव पठार येथे जावुन छापा टाकुन दोन संशयित इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) प्रथमेश पंकज देसाई वय २१ वर्ष रा. जाधव बिल्डिंग ३ मजला शिवपार्वती मंगल कार्यालयाचे शेजारी न-हे आंबेगाव पुणे २) अनिकेत आंनद केंद्रे वय २७ वर्ष रा. आझाद मित्र मंडळाचे शेजारी सिंहगड रोड वडगांव पुणे असे सांगीतले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे ३ पिस्टल व ५ काडतुसे मिळुन आली. सदर बाबत सिंहगड पोलीस स्टेशन येथे गु र.नं २३६/२०२६ आर्म अॅक्ट ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, सददाम तांबोळी, अजीम शेख, विनोद चव्हाण, योगेश मांढरे संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, रुषिकेश व्यवहारे महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे, विदया शिंदे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page