पहाटेचा ‘थरार’ पोलीसांचा ‘प्रहार’ कानिफनाथ घाटातील ०३ लुटारूंच्या १२ तासाचे आत फुरसुंगी पोलीस तपास पथकाने आवळल्या मुसक्या…

दिनांक ११/०६/२०२६ रोजी पहाटे ०४:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र आकाश, अथर्व व मैत्रीण खुशी असे त्याचेंकडील दोन अॅक्टीवा दुचाकी वरुन कानीफनाथ मंदीर ता. पुरंदर जि.पुणे येथे सिटी व्हीव पॉईंट जवळ आले असता स्प्लेंडर मो. सा. वरुन आलेल्या तिन अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचे मित्रांना रस्त्यामध्ये आडवुन हाताने व दगडाने मारहाण करुन जबरदस्तीने फिर्यादी व त्यांचा मित्र आकाश कडील असे १५,००० रु. किमतीचे दोन मोबाईल हँडसेट व ऑनलाईन घेतलेली १३,३०० रक्कम घेवुन पळुन गेले आहेत. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फुरसुंगी पो.स्टे. येथे गु.र.नं. २५१/२०२६ भा.न्या. सहिता-२०२३ चेकलम ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Advertisement

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने अमोल मोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन फिर्यादीमध्ये दिलेल्या वर्णनाचे अनोळखी तीन इसम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पोलीस पथकाने गोपनिय माहितीचा प्रभावी वापर करून पाहिजे आरोपी त्यापैकी १) उंच, साडपातळ, दाढी वाढलेली, कानात बाळी, टी शर्ट व ट्रॅक पॅन्ट परिधान असलेला, २) थोडा जाडसर असलेला, ३) इतर एक याचा शोध घेत असताना पो.अं. ७९४० कामथे, पो.हवा ६४९३ वणवे यांचे गोपनिय बातमीदाराकडून प्राप्त माहितीप्रमाणे तसेच आरोपींचे मिळालेल्या मोबाईल नंबरचे पोहवा श्रीनाथ जाधव यांचे तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी हे कानिफनाथ पायथा, बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. मा. वरिष्ठांचे आदेशाने तपास पथकाने संशयीतांचा कानिफनाथ पायथा, बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे येथे शोध घेतला असता वरील वर्णनाचे इसम नामे १) प्रतिक दिलीप फडतरे, वय २२ वर्षे, धंदा रसवंतीगृह, राहणार- मु.पो. बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे, २) ओंकार सुनिल फडतरे, वय २७ वर्षे, धंदा शेती, रा. सदर, ३) गणेश नवनाथ कामठे, वय २७ वर्षे, धंदा शेती, रा. चांबळी, चिलवाळी वस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात येवून मे. कोर्टाकडून पोलीस कस्टडी घेण्यात आली असून त्यांचेकडे केले तपासामध्ये गुन्हयात वापरलेली मो.सा. व मोबाईल असा एकुण ५५,०००/- रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. जिवन बेनीवाल, पोलीस उपआयुक्त परि.-०६, पुणे शहर, मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर राजेश खांडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उप. निरीक्षक विनोद पवार, पोलीस उप निरीक्षक बापुसाहेब खंदारे, सहा.पो. फौ.कदम, पोलीस हवा. नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, सागर वणवे, पो. अंमलदार हेमंत कामथे, योगेश गायकवाड, गणेश शिंदे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

वरील गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक विनोद पवार, फुरसुंगी पो.स्टे हे करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page