भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी खुनाचा गुन्हा उघडकीस..!

दिनांक २०/०५/२०२५ रोजी रात्रौ २१.०० वा चे सुमारास शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या दरम्यानच्या सर्व्हस रोडवर, थबाडी, आंबेगाव बु, पुणे येथे एका महीलेच्या डोक्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन धारधार हत्याराने वार करुन, तिस गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे म्हणुन समीर विलास कदम, वय ४२ वर्षे, धंदा नोकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेमणुक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे यांनी अज्ञात इसमाचे विरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २६२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे मा. वरीष्ठांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयातील आरोपीचा तात्काळ शोध घेवुन त्यास अटक करणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम. पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, व तपास पथकातील अंमलदार यांनी मयत महीलेचा मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन तिचे मोव्हर्मेन्टवरुन कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंचे सुमारे १०० आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये मयत महीला ही दुचाकी गाडीवर बसुन नवले पुलावर आल्याचे समजले. नवले पुलाचे जवळील आस्थापनांचे सुमारे ७० सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करीत असताना त्या भागात दिनांक २०/०५/२०२५ रोजी भरपुर पाऊस पडत असल्याने व सार्वजनिक रोडवरील लाईट अपुरी असल्यामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे तेथील रोडलगत असलेल्या खाजगी आस्थापनामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांची बारकाईने पाहणी करीत असताना तेथे विज चमकल्यामुळे झालेल्या प्रकाशात मयत महीला एका रिक्षामध्ये बसताना दिसुन आली आहे. सदर रिक्षाचे वर्णनाची पाहणी केली असता ती रिक्षा टी.व्ही.एस कंपनीची व तिचे मागील बाजुचे हुड पुर्णता काळया रंगाचे असल्याचे समजले. त्या रिक्षाचा शोध होणेकरता पुणे आरटीओ कडुन टी.व्ही.एस कंपनीच्या पुणे शहरामध्ये रजिस्टर असलेल्या १०७९४ रिक्षांची माहीती प्राप्त करुन त्या रिक्षांपैकी १२०० रिक्षांची वाहतुक विभागाकडुन झालेल्या दंडात्मक कारवाईचे चलनावरुन रिक्षाचे पुढील व मागील फोटो प्राप्त केले. तरी खात्री करण्याकरता नमुद रिक्षाचा नवले पुलाकडुन कात्रजकडे जाणाखा हायवेवर आस्थापनांमधील १५० सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे रिक्षाचा शोध घेवुन त्यामध्ये रिक्षा व आरोपी नामे शाहरुख शकील मन्सुर, वय २७ वर्षे, रा. मुळ गाव अमखेरा, शहाजपुर, दमपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश २४६७६१ सध्या रा.लेन नंबर १६ ए, सय्यदनगर, इनामदार स्कुलजवळ, हडपसर, पुणे याने मयत महीलेचा खुन केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, चोरी असे एकूण ५ गुन्हे कोंढवा, हडपसर पोलीस ठाणेस दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाणे येथे १) गुरनं ११९३/२०२२, भादंविसं कलम ३९२, ३४ व २) १७०/२०२३, भादंविसं कलम ३९२, ३४१,३२३,३४ व हडपसर पोलीस ठाणे येथे ३) गुरनं ३६९/२०१६, भादंविसं कलम ३७९, ४) गुरनं ३४८/२०१६, भादंविसं कलम ३७९, ३४ ५) गुरनं ४४८/२०१५, भादंविसं कलम ३७९,३४ प्रमाणे दाखल आहेत

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page