चैन चोरीचे गुन्हयांमधील पाहिजे आरोपीस ताब्यात घेवून केली गुन्ह्याची उकल

दिनांक १०/०६/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोबत पथकातील पोलीस अंमलदार असे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचोरीचे अनुषंगाने गस्त करीत असताना पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख यांना त्यांचे बातमिदारा मार्फत गोपनिय माहिती प्राप्त झाली की, बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं १०१/२०२६, भा. न्या.सं.क ३०४ (२) या गुन्ह्यातील चैनचोरी करणारा संशयित इसम हा शिवाजीनगर मेट्रो स्टेशन जवळील मैदानात थांबलेला असून त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. सदर माहिती मिळताच लागलीच सदर ठिकाणी जावून खात्री करून स्टाफसह नमुद ठिकाणी तात्काळ रवाना होवून सदर ठिकाणी गेले असता बातमीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी वरील वर्णनाचा संशयित इसम मिळुन आला. त्यास साधारण १९/१५ वा. ताब्यात घेवून त्याला त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांने त्याचे नाव मुख्तार सय्यद नुर इराणी वय-२८ वर्षे धंदा काही नाही रा. कदम-वाक वस्ती, पठारे वस्ती, काळुबाई मंदिराचे पाठीमागे, लोणी काळभोर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी व तपास केला असता, त्याने दि. १०/०५/२०२६ रोजी लोकेश सोसायटी समोरील रोडवर, बिववेवाडी, पुणे येथे एका महिलेची चैन चोरी केल्याचे कबुल केले. त्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १०१/२०२६, भा.न्या.सं.क ३०४ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात असल्याचे समजले. नमूद आरोपीस गुन्ह्यांचे पुढील तपासकामी बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ वर्षा देशमुख, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार अमित गद्रे, महेश पाटील, अजित शिंदे, प्रदिप राठोड, दत्तात्रय पवार, बाळु गायकवाड, धनंजय ताजणे, रविंद्र लोखंडे, महिला पोलीस अंमलदार साधना पवार सर्व नेमणुक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page