सराईत आरोपीकडुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस ३,००,०००/- रुपये किं. चे सोन्याचे मंगळसुत्र जप्त

दि. ०४/०६/२०२६ रोजी दुपारी १६/२३ वा. ते रात्रौ २०/१० वा. दरम्यान फिर्यादी याचे राहते घर सर्वे. नं ३२/१२ प्लॉट नं ११, आंबेगांव बु. जगताप बिल्डिग बंगला आंबेगांव पठार पुणे येथील बंद दरवाजाचे कुलुप घरातील कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२७/२०२६ भा. न्या. संहिता कलम ३०५,३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा मा. वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे हे गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरांचे तांत्रिक विश्लेषण करुन शोध घेत असताना नमुद अंमलदार यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी यश ऊर्फ पांड्या संतोष कुचेकर, वय २० वर्षे, रा. तळजाई माता वसाहत, रेशनींग उकरंडे दुकानाचे मागे, पदमावती, पुणे यांने केल्याचे खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरी केले ३,००,०००/- रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र जप्त केले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परि-२ चे श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभागाचे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, महेश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page