नांदेडमध्ये 200 जणांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा; अनेक जण गंभीर

नांदेड : नांदेड शहराजवळच्या नेरली या गावात 200 हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. पिण्याच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. गावातील सार्वजानिक टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो. याच टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री काही जणांना उटल्या , जुलाब , चक्कर येणे असा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर मात्र हा प्रकार वाढत गेला. विषबाधा झालेल्या नागरिकांना तातडीनं रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

पिण्याच्या पाण्यातून झाली विषबाधा

Advertisement

गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी प्यायल्यानं गावकऱ्यांना उलट्यासह चक्कर आणि डोकेदुखी होऊ लागली. हळू-हळू हा त्रास वाढत गेला. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं मिळेल त्या वाहनानं रुग्णांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्रीतून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली. आज (28 सप्टेंबर) सकाळपासून देखील अनेकांना असाच त्रास होत असल्याचं बघायला मिळतंय. त्यांची तपासणी करुन उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या प्रकाराबाबत माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पथकासह नेरली येथे भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीपासून हे आरोग्य पथक गावातच तळ ठोकून असून गावातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करत आहे. हा प्रकार कशामुळे झाला याचा देखील शोध घेतला जात आहे. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी पिल्यानेच हा प्रकार घडला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सध्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून टाकीची स्वच्छता करण्यात येत आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page