अवैध हातभट्टी दारु विक्री करणा-या इसमाकडुन एकुण ५,२३,०००/- रु किंमतीची दारु जप्त, काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी”

दि.२४/०५/२०२६ रोजी रोजी काळेपडळ पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे अधिकारी य पोलीस अंमलदार हे काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे हवद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे अनुशंगाने पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार नितीन ढोले व गिरीराज जगदाळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम गणपती मंदिरामागे, सातयनगर, हांडेयाडीरोड, पुणे येथील मोकळ्या जागेत त्याचेकडील चार चाकी वाहनांमध्ये गावठी हातभट्टीचा साठा करुन, त्याचे ओळखीचे लोकांना हातभट्टी विक्री करीत आहे. सदरबाबत त्यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि अमित शेटे यांना कळवुन, त्यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविली असता, त्यांनी तात्काळ बातमीप्रमाणे कारवाई करण्याबाबत सुचना दिल्याने, सपोनि अमित शेटे व पोलीस स्टाफ यांनी दोन पंचांसह बातमीच्या ठिकाणी छापा टाकुन इसम नामे सुनिल हरि कचरायत, यय-५० वर्षे, रा-गणपती मंदिराजवळ, सातवनगर, हांडेवाडीरोड, पुणे यास ताब्यात घेतले असता, त्याचे आजुबाजुच्या झाडाझुडपात व चार चाकी सेंट्रो कार क्र. एम.एच.१२/डि.एस./४०८० मध्ये एकुण २४५० लिटर हातभट्टी दारुचे एकुण ७० प्लास्टिकचे ड्रम असा एकुण ५,२३,०००/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरबाबत काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि.नं. २३८/२०२६, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई), (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही जीवन बेनीवाल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, अतुल नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने केली आहे




