सराईत मोटार सायकल चोरास बेड्या ठोकुन १,६०,०००/- रु. किं. चा मुद्देमाल केला जप्त..!

दि.२४/०८/२०२५ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी गणेश उत्सवाचे अनुषंगाने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एक संशयीत इसम मोटार सायकल घेवून जात असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत यांना दिसला. त्यांनी सदरची माहिती तपास पथकाचे अधिकारी सुनिल भापकर यांना सार्निवली. तेव्हा पोलीस उप-निरीक्षक भापकर यांनी संशयितरित्या गाडी घेवुन जात असणा-या इसमास गाडी बाबत विचारपुस केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यास पकडुन त्याचेकडे चौकशी केली त्याने त्याचे नाव अनिल गणेश बिरादार वय २५ वर्षे, रा. महादेव कॉलनी, क्रिकेट मैदानाजवळ, लोहगाव, पुणे असे सांगितले. त्याचेकडे मिळुन आलेल्या MH-12-EU-2530 हया गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने सदरची गाडी त्याने मार्केटयार्ड गेट नं. १ येथील पार्कींग मधुन गाडी चोरी केली असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस उप निरीक्षक भापकर यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील गुन्हयाचा अभिलेख तपासला असता सदरबाबत मार्केटयार्ड पो. स्टे. गु.र.नं. १७४/२०२५ मा.न्या.सं.क. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाली. सदर इसमास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्याचेकडे अधिक तपास करता त्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतुन इतर ०३ गाड्या चोरी केल्याचे कबुल केल्याने त्याबाबत तपास करता मार्केटयार्ड पो.स्टे. १) गु.र.नं. १५९/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२), २) गु.र.नं. १७५/२०२५ मा.न्या.सं.क. ३०३ (२), ३) गु.र.नं. १७७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) असे गुन्हे उघड झाले आहेत. सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि-०५ पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोलीरा अंगलदार दत्ता राऊत, राजेश थोरात, कौस्तुभ जाधय, महेश जेधे, किरण जाचय, नितीन झेंडे व आशिष यादव यांनी केली आहे.




