कारच्या काचा फोडुन चो-या करणारा सराईत आरोपीस केले जेरबंद सोन्याचे दागिन्यांसह एकुण १२,१८,०००/-रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत..!

अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत मागील काळात रोडच्या कडेला पार्क केलेल्या चार चाकी तसेच निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून चोरीचे ०६गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यांचा तपास करण्याबाबत मा. पोलीस उपायुक्त परि- ३ श्री. संभाजी कदम यांनी आदेशित केले होते.
सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान ज्या ठिकाणी चो-या झाल्या होत्या त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमे-याच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर चो-या करणारा आरोपी नामे राजू बाबुराव जावळकर वय ५७ वर्ष रा. डोणजे फाटा तालका हवेली जिल्हा पुणे यास अलंकार पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवडीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सखोल तपास करताच आरोपीने अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत वेळोवेळी कारच्या काचा फोडून केलेल्या ०६ गुन्ह्यांची कबुली देऊन त्यामध्ये चोरी केलेला खालील वर्णनाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
तपासा दरम्यान उघड झालेले गुन्हे
१) गु.र.नं. ७३/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३(२), ३२४(४)
२) गु.र.नं.७७/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ),३२४(४)
३) गु.र.नं.६०/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३ (२),३२४(४)
४) गु.र.नं.७२/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ),३२४ (४)
५) गु.र.नं. ७६/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ),३२४(४)
६) गु.र.नं.३१/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ),३२४(४)
सदर आरोपीकडुन वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले ९७.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अँपल कंपनीचा १ लॅपटॉप २ मोबाईल व ३०००/- रुपये रोख रक्कम, गुन्हयाकरीता वापरलेली ज्युपिटर मोपेड असा एकुण १२,१८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी राजू बाबुराव जावळकर याचेवर पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, अहिल्यानगर, पिंपरी चिंचवड या ठिकाणी विविध पोलीस स्टेशनमध्ये १०० हून अधिक गुन्ह्याची नोंद आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे
मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २ (अति. कार्य. परिमंडळ ३) श्री. मिलिंद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग श्रीमती सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्मिता पाटील यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, माधुरी कुंभार, राकेश क्षिरसागर, शिवाजी शिंदे, आशिष राठोड व विशाल मोरे यांचे पथकाने केली आहे.




