पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका

पुणे : पुणे स्टेशनसमोरील एका इमारतीमधील जनरल स्टोअर्सला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) पहाटे घडली. या घटनेत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या इमारतीमधील दुकानालगतच्या वरच्या भागात असलेल्या लाॅजमधील प्रवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली.

पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात लॉज आहे. लॉजच्या इमारतीत खाली अगरवाल जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणाव धूर येत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी याघटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. लागलीच जवान दोन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. आगीने उग्ररूप धारण केले होते. अग्निशमनच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

Advertisement

परंतु, आग मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच साहित्यात कागद, प्लास्टिक व इतर वस्तू असल्याने साहित्य जळून खाक झाले. आगीवेळी मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने घबराट पसरली होती. आगीत दुकानातील साहित्य जळाले असून, सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page