देवेंद्र फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणार; मनोज जरांगे यांचा इशारा

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण सुरु केलं आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षण द्या असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे. तसंच ओबीसीतून आरक्षणासाठीच ते आग्रही आहेत. याआधीही त्यांनी उपोषण केलं, सरकारशी चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषण सुरु केलं आहे. ज्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. जरांगें यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचं अल्टिमेटम दिलंय. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला गुडघे टेकायला लावणार असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं सहावं आमरण उपोषण सुरू झालंय.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा… मनोज जरांगे पाटील यांची मागणी स्पष्ट आहे. मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या… त्यामुळे या आमरण उपोषणातून कोणता मार्ग निघतोय का? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




