अरविंद केजरीवाल यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण होणार?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहे. अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी संध्याकाळी 4.45 वाजता लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. दिल्ली सरकारने 26 आणि 27 सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे.
रविवारी तिहार तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपला निर्णय जाहीर केला होता आणि सांगितले होते की, ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि आगामी काळात जनतेने त्यांना ‘प्रामाणिकपणा’ दाखवला तरच या पदावर परत येईल. दिल्लीत लवकर निवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी केली. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 23 फेब्रुवारी रोजी संपत असून फेब्रुवारीच्या सुरुवातीला निवडणुका होण्याची शक्यता आहे.
आतिशी पुढील मुख्यमंत्री असतील
आता अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आतिशी दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत. मंगळवारी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि भारतीय जनता पक्षाच्या सुषमा स्वराज यांच्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




