पुण्यातील परिस्थितीवरुन राज ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा, म्हणाले…

पुणे : राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पुण्यात पावसामुळे पाणीबाणी अशी पूरस्थिती निर्माण झाली होती. खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्यात आल्याने ही परस्थिती उद्भवल्याचे सांगत महापालिकेतील एका अधिकाऱ्याचे निलंबनही करण्यात आलंय. मात्र, या परिस्थिती सर्वचजण जबाबदार आहेत. सध्या प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासनच जबाबदार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.

Advertisement

राज ठाकरेंनी पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी नाव न घेता अजित पवारांना लगावला आहे.

सरकारकडे टाऊन प्लॅनिंग नाही

नदीत अनधिकृत बांधकाम झाल्यामुळेच पूरस्थितीची घटना घडली. सरकारने मदत करणे गरजेचे आहे, वाऱ्यावर सोडून चालणार नाही. सरकारकडे टाऊन प्लॅनिंग काही नाही, अचानक जास्त पाणी सोडल्याने ही घटना घडली, घरात पाणी शिरले. कोणत्याही शहरात टाऊन प्लॅनिंग चालवलं जातं नाही. दिसली जमीन की विक, असंच चालू आहे. नेक्सस चालू आहे. एक पुणे नाही तर पुण्यात पाच पाच शहर झाली आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी पुण्याच्या विस्तारीकरणावर भाष्य केलंय.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page