मोक्का व खुनाचा प्रयत्नाचे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या दोन आरोपींना केले जेरंबद..!

शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं ८९/२०२५ भा.न्या.सं.क १०९ (१), १८९ (२),१८९ (४), १९१(१),१९१(२), ३२४(४),१२६(२),३५१ (२), ३५१ (३), ३५२ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ सह मोक्का ३ (१) (ii), ३(२), ३(४) या गुंन्हयातील पाहिजे आरोपी प्रथम नितीन मोहिते रा. माऊली निवास खडकपुरा पेठ, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ जिल्हा बीड हा सदर गुन्हयामध्ये त्याचे नाव निष्पन्न झाल्यापासून फरार होता. सदर आरोपीचा यापुर्वी त्याच्या मुळ गावी बीड येथील पत्यावर जावून शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर सदर आरोपीबाबत अधिक तपास केला असता सदरचा आरोपी हा पोलिसांना त्याची माहिती मिळू नये म्हणून त्याच्या राहते घरी न राहता बीड मधील वेगवेगळया ठिकाणी राहत असल्याचे समजले होते. दि. ०३/०४/२०२६ रोजी सदरचा आरोपी हा त्याच्या बहिणीच्या घरी आडस ता. धारुर जि. बीड या ठिकाणी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक- ०१ कडील पोलीस अंमलदार अमोल आवाड व मयुर भोकरे यांना भेटली होती. त्यानुसार सदर ठिकाणी जावून सापळा रचून आरोपी सदर ठिकाणी येताच छापा टाकून त्यास दि. ०४/०४/२०२६ रोजी ०३.५५ वा. ताब्यात घेवून सदर आरोपीस पुणे येथे आणून पुढील तपासकामी सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले.
दिनांक ०३/०४/२०२६ रोजी युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी १) स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं ८०/२०२५ भा.न्या.सं.क १०९,१८९ (४)१९०,१९१(१) १९२(२) ३५२ म.पो.का.क ३७ (१) (३), १३५ आर्म अॅक्ट ४ (२५) क्रिमिनल लॉ अॅ कलम ७ तसेच २) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं १८४/२०२६ भा.न्या.सं.क ५५,६१,३(५) आर्म अॅक्ट क. ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) संह १३५ या गुन्हयातील १ वर्षापासून पाहिजे फरारी आरोपी अन्वर ऊर्फ जंम्बा शाकिर शेख वय २३ वर्ष रा. ग.न.१५ स.न.४२५/२१६ औदयगिक वसाहत गुलटेकडी पुणे यास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून गुलटेकडी येथून ताब्यात घेवून पुढील तपासकामी स्वारगेट पोलीस ठाणेच्या ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सपोनि राजेश माळेगावे, युनिट २ चे पोलीस निरीक्षक आश्विनी जगताप, सपोनि अमोल रसाळ व पोलीस अंमलदार रणजित फडतरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, बालारफि शेख, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, मयुर भोकरे, अमर पवार, अझीम शेख, सद्दाम तांबोळी, विनोद चव्हाण, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, शंकर कुंभार, विजयकुमार पवार व शिवानंद कायगुडे तसेच महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे व गीतांजली जांभुळकर यांनी केली आहे.




