तीन महिन्यापासुन शरिराविरुधच्या गुन्हयामधील फरार आरोपीस केले जेरबंद..!

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं ५२/२०२६, भा.न्या.सं.क. ११८(२),११५(२),३५२,३ (५), महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कायदा कलम ३७ (१), सह १३५ या गुन्हयामध्ये मागील तीन महिन्यापासुन फरार असलेला आरोपी अष्किार राजेश जगताप रा. ओहाळवाडा कात्रज पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे शोध घेत असताना पाहीजे आरोपी अष्किार राजेश जगताप हा कात्रज जंक्शन हॉटेलच्या बाजुला थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेलजवळ जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक २/०४/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवारे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, किरण साबळे, मंगेश गायकवाड व संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page