राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आई माता मंदिर व गंगाधाम चौक येथे जड वाहतूक होऊ नये याकरीता येथे हाईट बॅरियर उभारण्याची मागणी..!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आई माता मंदिर व गंगाधाम चौक येथे जड वाहतूक होऊ नये याकरीता येथे हाईट बॅरियर उभारण्याची मागणी

पुणे पोलिस आयुक्त श्री. अमितेशजी कुमार साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

बुधवार दिनांक ११/६/२०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या आसपास गंगाधाम चौक याठिकाणी ट्रकने एका महिलेस चिरडले व तिचा जागीच मृत्यू झाला सोबत असणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे असे अपघात या गंगाधाम चौकात सतत होत आहेत .

मागच्या वर्षी देखील या परिसरातील महिलेचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. त्यावेळी विविध राजकीय पक्ष व नागरिकांनी आंदोलन केले होते.

जड वाहनास सकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेल पर्यंत बंदी घालण्यात आली. असे असून देखील त्याठिकाणी सऱ्हासपणे जड वाहनांची वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. वाहतूक पोलिसांची त्याठिकाणी कोणतेही कंट्रोल नसल्यामुळे असे अपघात वारंवार होत आहेत.

त्याठिकाणी वाहतूक पोलीस २४/७ असणे गरजेचे आहे . तसेच सदर ठिकाणी आईमाता मंदिर व गंगाधाम चौक रोड येथे हाईट बॅरिअर उभारावेत. जेणेकरून आईमाता रोडवर जड वाहने जाणार नाहीत व अपघात होणार नाहीत. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Advertisement

पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार साहेब यांनी तात्काळ डी.सी.पी.वाहतूक श्री. मनोज पाटील साहेब यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने मागण्यात आलेली हाईट बॅरिअर लावण्याची परवानगी देण्याच्या सुचना यावेळी केल्या.

त्याच बरोबर आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आज दुपारी ४.०० अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी स्वतः पोलीस कमिशनर श्री अमितेश कुमार साहेब भेट देणार असल्याचे आश्वासन त्यांनी राष्टवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाला दिले.

तसेच यावेळी मार्केट यार्ड येथे नागरिकांची, ग्राहक, व्यापारी, कामगार व टेम्पो चालक यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे वारंवार चोऱ्या सारखे गुन्हे होत असल्याने मार्केटयार्ड येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस चौकीकरीता पोलिस कर्मचारी देण्याची मागणीही यावेळी केली. त्यासंदर्भात डीसीपी श्री. राजकुमार शिंदे साहेब व मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील मॅडम यांच्याशी चर्चा करून गरज असेल तिथे पोलीस स्टाफ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी पर्वती विधानसभा अध्यक्ष श्री. संतोष नांगरे, श्री. रामदास गाडे, श्री. दिलीप अरुंदेकर, श्री. सुशांत ढमढेरे, श्री. रूपेश आखाडे, सौ. श्वेता होनराव, श्री. नितीन हनमघर, श्री. राहुल गुंड, श्री. गौरव कापर, श्री. अक्षय वायाळ, श्री. संग्राम होनराव आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page