पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पुण्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाऊस होत असल्याने पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र, असे असले तरी येत्या गुरुवारी पुण्यातील काही भागातील पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पाणी योग्य वापरावे, असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये गुरुवारी (दि.२५) रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

Advertisement

पर्वती जलकेंद्रामध्ये येत असलेल्या एमएलआर टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. ही गळती थांबविण्यासाठी संबंधित भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

या भागात पाणीपुरवठा बंद असणार

शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट, महात्मा फुले पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडीयम, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीजमागील काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page