पिंपरी चिचंवड आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांचे सहाय्याने अंमली पदार्थ मिश्रित भुकटी तयार करण्याच्या युनिटवर केली छापा कारवाई ६,६३,०००/- रुपयाचा मुद्देमाल, मोबाईल, मशीन व इतर साहित्य जप्त..!

दि.१३/०३/२०२६ रोजी लोणी काळभोर पो. स्टे. हद्दीत “मैफिल पान हाउस” वर केलेल्या छापा कारवाईच्या अनद्दषंगाने लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुरनं. ११५/२०२६ एनडीपीएस क ८ (क), १७ (ब), २२ (ब), २९ मधील दि. १४/०३/२०२६ रोजी पिंपरी चिंचवड भागात गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी २ अधिक तपास करीत असताना इसम नामे कैलास मांढरे हा अंमली पदार्थ मिश्रित भुकटी उत्पादन व विक्री करीत असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला असता हिंजवडी पो. स्टे. हद्दीत जांबेगाव ग्रा.पं. मागे, चैतन्य फुड गोडाऊन, जि. पुणे येथे आरोपी नामे १) कैलास दत्तात्रय मांढरे, वय ५४ वर्षे, व त्यांची पत्नी नामे २) अनुराधा कैलास मांढरे, वय ५४ वर्ष, दोघे रा. माळसाकांत चौक, आकुर्डी, पुणे हे अंमली पदार्थ मिश्रित भुकटी तयार करीत असताना सर्व साधन सामग्रीसह रंगेहाथ मिळुन आले. सदर ठिकाणावरून एकुण ६,६३,०००/- रु. किमतीची अंमली पदार्थ मिक्स पावडर व काळ्या रंगाचा अंमली पदार्थ मिश्रित पातळ पदार्थ, तीन मोबाईल, एक चार चाकी गाडी, वेगवेगळ्या मशीन जप्त करण्यात आल्या असुन वर नमूद आरोपींविरुद्ध हिंजवडी पो. स्टे. गुरनं. १५९/२०२६ एनडीपीएस क ८ (क), १७ (ब), २२ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक, यांचे विशेष मार्गदर्शनाखाली पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंपविप २, सपोनि नितीन नाईक व अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील सर्व अंमलदार यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page