दहशत माजविण्यासाठी जवळ देशी पिस्तोल बाळगणा-या सराईत आरोपीस केले जेरबंद..!

दि. १३/०३/२०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन तपास पथक प्रमुख किरण पवार यांनी सापाळा रचुन आरोपी नामे अजित सागर कसबे, वय २१ वर्षे, रा. स.नं. १५, विघ्नहर्ता सोसायटी, फ्लॅट नं. ५०४, आंबेगाव पठार धनकवडी पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण ४०,५००/- रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तोल, व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गुरनं. ६८/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख, अमोल दबडे, यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page