देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार ठरले; मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश? मंत्र्यांची संपूर्ण यादी !

५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.

नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला २३५ जागांचं घवघवीत बहुमत मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र ४९ जागांपर्यंतच मर्यादित राहिली. पण २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी १२ दिवसांनंतर म्हणजेच ५ डिसेंबरला झाला. यानंतर १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार पार पडला. नागपूर येथील विधीमंडळात हा पहिलाच मंत्रीमंडळ विस्तार आहे. एकूण ३९ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. या ३९ मंत्र्यांपैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अनेक चर्चा-बैठकांनंतर झाला देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी!

निकालानंतर १२ दिवसांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी मुख्यमंत्री कोण होणार? यावर बरेच तर्क-वितर्क आणि बैठका झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? यावरून बराच काथ्याकूट झाला. अखेर ५ डिसेंबरला शपथविधीला अवघे २ तास उरले असताना एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला संमती दर्शवली आणि ५.३० वाजता आझाद मैदानावर तिघांचा शपथविधी पार पडला.

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार? यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं. गृहमंत्रीपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली.

Advertisement

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी

क्रमांकपक्षमंत्र्यांचं नावजबाबदारी/खातं
भाजपादेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री
शिवसेनाएकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री
राष्ट्रवादीअजित पवारउपमुख्यमंत्री
भाजपाचंद्रकांत पाटीलकॅबिनेट मंत्री
भाजपामंगलप्रभात लोढाकॅबिनेट मंत्री
भाजपाराधाकृष्ण विखे पाटीलकॅबिनेट मंत्री
भाजपापंकजा मुंडेकॅबिनेट मंत्री
भाजपागिरीश महाजनकॅबिनेट मंत्री
भाजपागणेश नाईककॅबिनेट मंत्री
भाजपाचंद्रशेखर बावनकुळेकॅबिनेट मंत्री
भाजपाआशिष शेलारकॅबिनेट मंत्री
भाजपाअतुल सावेकॅबिनेट मंत्री
१०भाजपासंजय सावकारेकॅबिनेट मंत्री
११भाजपाअशोक उईकेकॅबिनेट मंत्री
१२भाजपाआकाश फुंडकरकॅबिनेट मंत्री
१३भाजपामाधुरी मिसाळराज्यमंत्री
१४भाजपाजयकुमार गोरेकॅबिनेट मंत्री
१५भाजपामेघना बोर्डीकरराज्यमंत्री
१६भाजपापंकज भोयरराज्यमंत्री
१७भाजपाशिवेंद्रराजे भोसलेकॅबिनेट मंत्री
१८भाजपानितेश राणेकॅबिनेट मंत्री
१९भाजपाजयकुमार रावलकॅबिनेट मंत्री
२०शिवसेनादादा भूसेकॅबिनेट मंत्री
२१शिवसेनागुलाबराव पाटीलकॅबिनेट मंत्री
२२शिवसेनासंजय राठोडकॅबिनेट मंत्री
२३शिवसेनाउदय सांमतकॅबिनेट मंत्री
२४शिवसेनाशंभूराज देसाईकॅबिनेट मंत्री
२५शिवसेनाप्रताप सरनाईककॅबिनेट मंत्री
२६शिवसेनायोगेश कदमराज्यमंत्री
२७शिवसेनाआशिष जैस्वालराज्यमंत्री
२८शिवसेनाभरत गोगावलेकॅबिनेट मंत्री
२९शिवसेनाप्रकाश आबिटकरकॅबिनेट मंत्री
३०शिवसेनासंजय शिरसाटकॅबिनेट मंत्री
३१राष्ट्रवादी काँग्रेस</td>हसन मुश्रीफकॅबिनेट मंत्री
३२राष्ट्रवादी काँग्रेसआदिती तटकरेकॅबिनेट मंत्री
३३राष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडेकॅबिनेट मंत्री
३४राष्ट्रवादी काँग्रेसदत्तमामा भरणेकॅबिनेट मंत्री
३५राष्ट्रवादी काँग्रेसबाबासाहेब पाटीलकॅबिनेट मंत्री
३६राष्ट्रवादी काँग्रेसनरहरी झिरवाळकॅबिनेट मंत्री
३७राष्ट्रवादी काँग्रेसमकरंद पाटीलकॅबिनेट मंत्री
३८राष्ट्रवादी काँग्रेसइंद्रनील नाईककॅबिनेट मंत्री
३९राष्ट्रवादी काँग्रेसमाणिकराव कोकाटेराज्यमंत्री

कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळणार?

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला असून आता उद्यापासून (१६ डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार? याची यादी लवकरच येण्याची शक्यता आहे. कारण मंत्र्यांना अधिवेशनात उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page