कर्जाची परतफेड करण्यासाठी चुलत भावाच्या घरी चोरी करणा-या इसमास केले जेरबंद..!

दिनांक ०५/०२/२०२६ रोजी सकाळी ०७/०० वा. ते दि.०६/०२/२०२६ रोजी दुपारी ०४/१५ वा.चे दरम्यान सर्वे नंबर ९४/बी, मुंढवा पुणे येथील फिर्यादीचे राहते प्लॅटमध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करुन एकुण ३७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदी तसेच रोख रक्कम दोन लाख रुपये असे एकुण २२,११,०००/- रु.कि.चा ऐवज चोरुन नेलेबाबत मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३२/२०२६ बी.एन.एस. कलम ३०५ (ए), ३३१ (३), ३३१ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस स्टेशन यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवून, पाहणी केली असता सदरचा प्रकार हा कोणीतरी ओळखीचे इसमाने केल्याचा संशय निर्माण झाला. त्या दृष्टीकोनातुन घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनिय बातमीदाराचे मार्फतीने सदर गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास करुन, फिर्यादी यांचा नातेवाईक आशुतोष अशोक कासवा, वय ३८ वर्षे, रा. सर्वेनंबर ९४/वी, मुंढवा पुणे. यास गुन्हयाचे अनुषंगाने ताब्यात घेवुन, त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने कसोशिने तपास करता, त्यांने सदर गुन्हयाची कबुली दिली. दाखल गुन्हयातील फिर्यादी याचे चोरीस गेलेले सोन्याचे दागीने व एक किलो चांदी तसेच रोख रक्कम असा एकुण २२,११,०००/- रु. कि.चा ऐवज हस्तगत करण्यात आला.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ६, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. अतुल कुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली त्याखाली, मुंढवा पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती स्मिता वासनिक यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहा. पोलीस फौजदार, राजु कदम, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर व योगेश राऊत यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page