मालकाच्या पैशांवर डल्ला मारणा-या कामगाराला चोरलेल्या रक्कमेसह अवघ्या २४ तासाच्या आत ताब्यात..!

दि.०६/०२/२०२६ रोजी १९/०० वा. ते दि. ०७/०२/२०२६ रोजीचे सकाळी ०९/३० वा. चे सुमारास फिर्यादी यांचे मालकीचे कामठे बाईक्स, रुतुजा रेसीडेन्सी, अण्णासाहेब मगर कॉलेज जवळ हडपसर पुणे येथील दुचाकी शोरुममध्ये असलेल्या काऊंटरचे ड्रॉव्हरमध्ये कामगारांचा पगार देण्यासाठी ठेवलेली २,७०,०००/-रु. रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ९४/२०२६ भा. न्या.स.क ३०५ गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांच्याकडे काम करणारा मुलगा बापुराव संदीपान गायकवाड याने गुन्हा केला असल्याचे पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर आणि अमित कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली. मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस आधिकारी व अंमलदार यांनी आरोपी बापुराव संदीपान गायकवाड, वय. २५ वर्षे, सध्या रा. कैलास नगर वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे मुळ रा.मु.पो निळज, ता. करमाळा, जि. सोलापुर यास लोणी काळभोर पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन २,५९,८००/- रु. रोख रक्कम व गुन्हा करुन पळून जाण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा मोपेड गाडी व मोबाईल असा एकुण ३,१७,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपी यास पुढील कार्यवाही करीता हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखा युनिट ०६, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे नासिर देशमुख यांचे पथकाने केली




