कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर Girnder समलिंगी डेटिंग अॅपवरुन संपर्क करुन लोंकांना लुटणारी टोळीस केले जेरबंद..!

कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं ३९/२०२६भा.न्या.स. क.३०९ (४),११५ (२),३५२,३५१(२) (३),३(५) दाखल गुन्हयात फिर्यादी यांना दि ११/०१/२०२६ रोजी या अॅपवरुन संपर्क करुन त्यास डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये बोलावुन सदर ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे असा मुद्देमाल जबरीने चोरी केल्याने गुन्हा दाखल.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस स्टेशनकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल नंबरवरुन आरोपीची नावे निष्पन्न झाल्याने पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी नामे राहिल शेख याच्या घराचे जवळ ए. जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु.पुणे येथुन आरोपी नामे १) रोहील अकिल शेख, वय १९ वर्षे, रा. ए. जे कंपनीचे समोर भाड्याने रुममध्ये सोमजी कोंढवा बु.पुणे २) नुहान नईम शेख वय १८ वर्षे रा. प्लॅट नं २०२, इसाक टॉवर, गल्ली नं ०२ लक्ष्मीनगर, कोंढवा बु.पुणे ३) शाहिद शाहनुर मोमीन वय२५ वर्षे, रा. बालाजी बिल्डींग, दुसरा मजला, संतोष नगर , गल्ली नं.०३ कात्रज पुणे व ४) ईशान निसार शेख वय २५ वर्षे रा. मातोश्री बिल्डींग, लेन नं. ०१ अंजलीनगर, कात्रज पुणे ५) वाहीद दस्तगीर शेख, वय १८ वर्षे, धंदा फॅब्रीकेशन, रा बिस्मील्ला मस्जिदचे जवळ, स.नं.४२ कोंढवा खुर्द, पुणे यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गावडे यांनी त्याचेकडे अधिक तपास केला असता गुन्हे उघडकीस आले आहेत. १) गु.र.नं.०३/२०२६ बीएनएस क.३०९ (४),३ (५) २) गु.र.नं.४२/२०२६ बीएनएस क. ३०९ (४),३ (५) आरोपीतांनकडुन गुन्हातील जबरदस्तीने चोरीचे ०३ मोबाईल फोन, लोखंडी कोयता व आरोपीतांनी गुन्हात वापरलेल्या २ दुचाकी हस्तगत केल्या.

Advertisement

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील. मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा.सपोआ वानवडी विभाग, पुणे श्री. कुमार घाडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नवनाथ जगताप, पोलीस निरिक्षक (गुन्हे). यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरिक्षक श्री रविंद्र गावडे व पोलीस अंमलदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके पुष्पेंद्र चव्हाण, रशिद

शेख, सुहास मोर, अमित सुर्यवंशी, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, रियाज पटेल, केशव हिरवे, शाहिद राजपुत, प्रशांत खाडे, राहुल शेलार यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page