वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू..!

वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Advertisement
  • नऱ्हे भागात अपघात
    पुणे, भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी वाहनचालकावर गु्न्हा दाखल केला आहे. बाबुराव श्यामा राठोड (वय ५५, रा. कुणाल हाईट्स, इंगळे वस्ती, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत राठोड यांचा पुतण्या विजय (वय २५) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बाबुराव राठोड सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नऱ्हे भागातील अभिनव महाविद्यालय रस्त्याने निघाले होते. वाल्हेकर चौकात ते थांबले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अवजड वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. सहायक निरीक्षक एस. एस. चव्हाण तपास करत आहेत.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page