घरफोडीचा गुन्हा उघड आरोपीस केले जेरबंद, एकुण १८,५०,०००/- कि.रु.चा सोन्याचे दागीने केले हस्तगत..!

दि.०७/०१/२०२६ रोजी ११/४५ ते १३/३० वा.चे दरम्यान फिर्यादी या त्यांचे एस.जी. सुपरमार्केट व लेडीज टेलर सर्व्हे नं. १५३/ २ शंकरराव जाधवनगर येरवडा पुणे दुकानात असताना एक अनोळखी इसम खरेदी करण्याचे बहाण्याने त्यांचे दुकानात आला व फिर्यादी यांनी शिलाई मशिनवर एक पिसवीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा मुददेमाल चोरी करुन निघुन गेला. सदरबाबत दिले तक्रारीवरुन विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.०७/२०२६ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम ३०५ (अ) प्रमाणे दि.०९/०१/२०२६ रोजी दाखल आहे.

दि.१८/०१/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर हे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल इंगळे व प्रफुल्ल मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हडपसर माळवाडी सिरम कंपनीजवळील जुने कॅनलवरील पुलाजवळ सोने विक्री करणेकरीता त्याचेकडील स्कुटरसह संशयीतपणे थांबलेला आहे. वगैरे बातमी मिळताच मा. वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना सदर पोलीस पथक नमुद ठिकाणी रवाना झाले तेथे इसम नामे जयेश चंद्रशेखर खिच्ची, वय ३९ वर्षे, रा. साई सोसायटी जिल्हा परिषद शाळेजवळ राजेंद्र खराडे यांचे घरात भाडयाने मांजरी खुर्द पुणे. हा मिळुन आला असता ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक सोन्याचे मोठे मंगळसुत्र, एक सोन्याचे लहान मंगळसुत्र, एक कानातील झुमके जोड व एक सोन्याची अंगठी असे एकुण १३८ ग्रॅम १९० मिली सोन्याचे दागीने व अॅक्टीव्हा स्कुटर असा एकुण १८,५०,०००/-रु. किमतीचा मुददेमाल मिळुन आला.

Advertisement

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १) हडपसर पो.स्टे गु.र.नं.३०५/२०११ भा.द.वि. कलम ३८०, ३४, २) चंदननगर पो. स्टे गु.र.नं.१६२/२०१७ भा. द. वि. कलम ३८०, ३) महाड शहर (रायगड) पो. स्टे भा.द.वि. कलम ३७९, ५११., ४) वानवडी पो. स्टे गु.र.नं.१८७/२०१४ भा.द.वि. कलम ३७९, ३४. ५) कोंढवा पो.स्टे गु.र.नं.९६/२०२० भा.द.वि.कलम ३८०, ३४. ६) कोंढवा पो. स्टे गु.र.नं.९४२/२०२० भा.द.वि. कलम ३८०, ३४., ७) लोणीकंद पो.स्टे गु.र.नं.७६७/२०२१० भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०.

सदर गुन्हा मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांचे सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सी.बी.बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस.जे. तानवडे, पोलीस अंमलदार कैलास चव्हाण, राजु पुणेकर, परेश सावंत, गणेश लोखंडे, दत्ताञय खरपुडे, मयुर सुर्यवंशी, राहुल इंगळे, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले, संदिप येळे व विक्रांत सासवडकर यांनी उघडकीस आणला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page