जय भीम ..जय भीम म्हणल्याचा राग आल्याने विभागीय संपादक राजाराम बोराडे यांना अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करा – मराठी बहुजन पत्रकार संघ
ज्योतिष विजय हजारी यांना जय भीम म्हणल्याचा राग आल्याने विभागीय संपादक राजाराम बोराडे यांना अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करा – मराठी बहुजन पत्रकार संघ व पुणे शहर अध्यक्ष अकबर शिकलकर यांची मागणी….
दि. 9/11/2023 सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील रहिवाशी पुणे विभागीय संपादक राजाराम बोराडे यांना ज्योतिष विजय हजारे यांनी अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करून पुण्यावरून येऊन तुला जिवे मारीन अशी धमकी दिल्याप्रकरणी या विजय हजारीवर पत्रकार संरक्षण कायद्यासह इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करा असे तक्रारी अर्ज मराठी बहुजन पत्रकार संघाच्या वतीने नांदेड पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत कुर्डूवाडी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे विभागीय संपादक राजाराम बोराडे हे एक उत्कृष्ट पत्रकार सह ज्येष्ठ ज्योतिष असल्याकारणाने पुणे येथील ज्योतिष विजय हजारी यांनी ज्योतिष अक्षरांमध्ये एक पुस्तक प्रकाशित केले असून पुस्तक क्रमांक १. भाव नवमांश रहस्य, (प्रश्न नवमांशासहित) पुस्तक क्रमांक २. ज्योतिषशास्त्राची गुरुकिल्ली संपूर्ण पुस्तक हे सूडबुद्धीने लिखाण करून प्रकाशित करण्यात आले आहे याच पुस्तकातील भाषेची रचना संदर्भात पुस्तक लेखक विजय हजारी यांना विभागीय संपादक तथा ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक राजाराम बोराडे यांनी फोनद्वारे संपर्क करून प्रतिक्रिया घेतली असता प्रथम हॅलो म्हणण्याऐवजी जय भीम असे बोलले असता ज्योतिष विजय हजारी यांना जय भिम म्हणण्याचा राग आल्यावर त्यांनी बोराडे सर यांना जिवे मारण्याची धमकी दिली की तू कसला ज्योतिष अभ्यासक आहेत आणि तू मला जय भीम कसा काय म्हणलास मी ब्राह्मण उच्च जातीचा आहे तुला तुझ्या कुर्डूवाडी गावात येऊन तुझे दात पाडीन व तुला कायमचे संपवून टाकेन पत्रकार तुला चांगलाच धडा शिकवतो असे अनेक अर्वोच्च भाषा वापरून हजारी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस निरीक्षक यांना मराठी बहुजन पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून सदर कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवार यांनी या तक्रारी अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन विजय हजारी यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायदा सह इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जेलबंद करावे असेही या निवेदनात पत्रकार संघाची मागणी सादर करण्यात आली आहे जर का हजारी यांच्यावर कुर्डूवाडी पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई न झाल्यास विभागीय संपादक राजाराम बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल सदर या गंभीर विषयाकडे कुरूडवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवार हे कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळून संबंधितावर कारवाई करून जेलबंद करतील का ? याकडे समस्त पत्रकार बांधवांचे लक्ष लागले आहे.
जन हक्क times
pune
वार्ताहर अकबर जी शिकलकर




