पुण्यातील नामांकित ज्वेलरी शॉप चालकांना बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणा-या भामट्यास केले जेरबंद..!

  • दिनांक २३/११/२०२५ रोजी १९/३० वा.चे सुमा. पीएनजी ज्वेलर्स शाखा, विमाननगर पुणे या शॉपमधुन एका इसमाने बनावट अंगठी ट्रे मध्ये ठेवुन हातचलाखीने एक लाख रुपये किंमतीची सोन्याची खरी अंगठी चोरी केल्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांचे आदेशान्वये, तपास पथकाला सदर इसमाचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विमानतळ तपास पथकातील पोलीस स्टाफने सदर आरोपीचा शोध घेतला.
  • दिनांक ३०/११/२०२५ रोजी सदर आरोपी हा पी. एन. जी. ज्वेलर्स शाखा, औंध येथे अशा प्रकारे चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्याप्रमाणे नमुद आरोपी यास ताब्यात घेण्यात आलेले असून, त्याचे नाव सैफ दिलीप बेळगावकर, वय २९ वर्षे, रा. शाहीद हकीम यांचेकडे भाड्याने, गल्ली नं ०५, केदारेनगर, वानवडी, पुणे. असे आहे. त्यास सदर दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन सदर आरोपीकडुन १,००,०००/- रु. किं. ची सोन्याची अंगठी हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर आरोपीने अशा प्रकारे ब-याच सराफ व्यवसायीकांना फसवल्याची माहिती मिळाली असुन त्या अनुषंगाने तपास चालु आहे.
  • सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, दादासाहेब बर्डे, हरीप्रसाद पुंडे, लालु क-हे, राहुल जोशी, अंबादास चव्हाण, सागर कासार, पांडुरंग म्हस्के व शंकर वाघुले यांचे पथकाने केली.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page