दुय्यम निबंधक कार्यालयात मोठा भ्रष्टाचार; अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा आरोप

पुणे – पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे महसूल खात्याला 3 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचा दावा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केला आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने काय म्हटलंय, वाचा जश्याचं तसं
दिनांक 16/8/2024 रोजी क्रमांक हवेली क्रमांक 19 निबंधक कार्यालय या ठिकाणी दस्त नोंदणी क्रमांक 18414/2024 ह्या दस्त नोंदणीसाठी नोंदणी अधिकारी संतोष वीर यांनी 500 रुपये मुद्रांक शुल्क घेऊन दस्त नोंदणी केली होती. पण अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा तीव्र निषेध व विरोध करून सहाय्यक जिल्हा निबंधक (वर्ग क्रमांक 1) मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून त्याची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आणि दस्त नोंदणी झाल्यानंतर सुद्धा त्याची स्कॅनिंग करण्यासाठी एक दिवस अवधी मिळते त्या अवधीमध्ये सुद्धा स्कॅनिंग करू नये अशी तक्रार अर्जामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले होते.
पण दुय्यमनिबंध संतोष वीर यांनी या अर्जाचा विचार न करता सर्व दस्त स्कॅनिंग करून मिळकती धारकांना देऊन टाकले. तरी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर शिकलकर, माहिती अधिकार अध्यक्ष गणेश घाडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे, या सर्वांनी सहाय्यक निबंधक वर्ग क्रमांक 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी धर्मदेव माईनकर यांच्याकडे तक्रार अर्जावर विचार करण्याची गरज आहे अशी त्यांना विनवणी केल्यानंतर त्यांनी त्या तक्रार अर्जावर विचार करण्यास भाग पडले. म्हणून आज केवळ 500 रुपये वर दस्त नोंदणी करण्यात आली होती.
त्या दस्ताचा बाजार भाव प्रमाणे मूल्यांकन रक्कम रुपये 3 करोड 28 लाख 51 हजार रुपये इतका भरण्यासाठी मिळकतधाराना नोटीस पाठवण्यात आली आहे. हेच कार्य त्याच्या अगोदर विचारपूर्वक केला असते तर सरकारचा मुद्रांक शुल्क सरकारी तिजोरीमध्ये जमा झाला असता. पण लिपिक म्हणून काम करणाऱ्या संतोष वीर यांना एक दिवसीय प्रभारी म्हणून हवेली क्रमांक 19 या ठिकाणी दुय्यमनिबंधक म्हणून पदभार दिला होता. त्यामुळे त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार करून सरकारच्या मुद्रांक शुल्क बुडीत काढून करोडो रुपयांचा घोटाळा त्यांनी केला. महोदय अशी हलगर्जीपणाने काम करणारा नोकरदार कशासाठी पाहिजे?? सरकारचा तिजोरीवर डल्ला मारणारा असल्या नालायक नोकरदार कशासाठी पाहिजे? सरकारचा पगार घेऊन सरकारचा तिजोरीवर डल्ला मारणारा असल्या नोकरदारांचा काही उपयोग आहे. म्हणून महोदय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आपल्याकडे कळकळीची विनंती आहे की संतोष वीर यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व त्यांची मालमत्ता सरकार जमा करण्यात यावी. अशी कित्येक ठिकाणी यांनी भ्रष्टाचार केला असेल त्याची पूर्ण खातेहिन चौकशी करण्यात यावी. त्यांना त्वरित व तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून जेलमध्ये पाठवण्यात यावी. अशी आपल्याकडे कळकळीची विनंती आहे. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल याची दखल आपण घ्यावी.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अकबर शिकलकर
महाराष्ट्र प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष श्री गणेश घाडगे
पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




