रेकॉर्डवरील गुन्हयातील आरोपीतास ०१ गावठी पिस्टल, ०१ खाली मॅग्झीन, ०३ जिवंत काडतुसासह केले जेरबंद..!

दि.०२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखा, युनिट-३ चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस अमंलदार अमोल काटकर, नितिन जगदाळे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, संदीप शेळके, अतुल साठे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे येथे आले असताना पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे पुर्वेश ऊर्फ सार्थक दिनेश चव्हाण वय २२ वर्ष रा. प्लॅट नंबर १३२५ एचबीसी बिल्डींग, हिराबाग चौक, शुक्रवार पेठ, पुणे हा त्यांचेकडे अवैधरित्या बेकायदेशिर त्यांचे ताब्यात ०१ पिस्टल व ०३ जिवंत काडतुस, ०१ खाली मॅग्झीन जवळ बाळगलेले असताना त्याला भारत पेट्रॉलसमोरील गल्ली मध्ये, टिळक रोड, पुणे येथे थांबला असताना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशिर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. पंकज देशमुख,, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री. विजय कुंभार, यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, राम राजमाने, सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस अमंलदार अमोल काटकर, नितिन जगदाळे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, संदीप शेळके, अतुल साठे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page