३,१०,०००/-रु.कि.चे २१/- मोबाईल केले हस्तगत..!

पुणे शहरात मोबाईल फोन हरवलेबाबत व चोरी झाले बाबत अनेक तक्रारी प्राप्त आहेत. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे डिसेबर २०२५ मध्ये पेट्रोलिंग दरम्यान हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेत होते. गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अंमलदार सददाम तांबोळी व साधना ताम्हाणे यांनी तांत्रिक विश्लेषन करुन युनिट २ चे हददीतील पोलीस स्टेशन मधील गहाळ झालेल्या तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा पुणे शहर व इतर अनेक ठिकाणाहुन शोध घेवुन वेगवेगळ्या कंपनीच्या व किमंतीचे एकुण २१ मोबाईल फोनचा शोध घेवुन सदर मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. मिळून आलेल्या मोबाईल फोनबाबत संबधीतानं संपर्क करुन त्यांचेकिमंती मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार सददाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संजय जाधव, शंकर कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजय कुमार पवार, नागनाथ राख, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, गणेश थोरात, विशाल दळवी, अजीम शेख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, संदिप शिर्के व विनायक वगारे या पथकाने केली आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page