बालकाकडुन ५,६०,०००/- रुपयांचे ७३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने केले हस्तगत..!

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १७९/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबतचे मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, अभिनय चौधरी यांना सदरचा गुन्हा विधीसंघर्षीत बालकाने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन नमुद गुन्हयातील चोरी केले ५,६०,०००/- रुपयांचे ७३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार यांच्या पथकाने केली आहे.




