देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसासह रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले जेरबंद..!

दिनांक १३/१२/२०२५ रोजी सहा. पोलीस निरीक्षक राहुल नामदे व पथकातील पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन आरोपी नामे भिमराव नरसप्पा मानपाडे, वय २४ वर्षे, रा. साईनगर २ रा मजला, साई जीम जवळ, गुलाबनगर, धनकवडी, पुणे यांस अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस असे एकुण ३७,०००/- रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८८/२०२५ आर्म अॅक्ट क. ३ (२५), म.पो.अधि.क. ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्रीमती सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे व समिर जोशी यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page