देशी बनावटी पिस्टल बाळगणा-या इसमास केले जेरबंद..!

दि.२२/११/२०२५ रोजी युनिट ०१ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट ०१ चे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंबडी पुल, जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयाजवळ मंगळवार पेठ, पुणे येथे सार्वजनिक रोडवर एक इसम उभा असुन त्याचे कमरेला गावठी कट्टा लावलेला आहे, तो काहीतरी गुन्हा करणेचे इराद्याने तेथे उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांना कळविले असता त्यांनी पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे यांना स्टाफसह मिळालेल्या बातमी बाबत योग्य ती खात्री करून कार्यवाही करण्यासाठी आदेशित केले. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद वर्णनाच्या इसमास ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रमजान ऊर्फ टिपु आदम पटेल, वय ३३ वर्षे, रा. भाजी बाजार शिरुर ता. शिरुर जिल्हा पुणे असे सांगितले. सदर इसमाची अंगझडती घेतली असताना त्याचे कमरेला ५०,०००/-रु. किं. चा एक गावठी पिस्टल व खिशात १,०००/-रु. किं. चा एक जिवंत काडतुस मिळुन आले. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सदर इसमाविरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २१५/२०२५ आर्म अॅक्ट क.३ (२५) म.पो.का.क. ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे ०१ पुणे शहर श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, निलेश साबळे, शशीकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयुर भोसले, सिध्देश्वर वाघमारे, उमेश मठपती, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, सदेश काकडे, ज्योती मुल्का, रुक्साना नदाफ व मयुरी जाधव यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page