जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद..!

जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर एका इसमाला दमदाटी तसेच मारहाण करुन गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची चैन, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी असा ऐवज जबरी चोरी करुन घेऊन गेले बाबत येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.६८२/२०२५ भा.न्या.सं.क. ११९(१) ११९(२) ३(५) ३५१(२) ३५२ ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हयांच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन चे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे तपास करीत असताना पोलीस अंमलदार अक्षय शिंदे व पोलीस अंमलदार जायभाय यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे पाण्याचे टाकी जवळ, अशोकनगर, येरवडा येथे थांबले असुन सदर आरोपी हे पुणे शहर परीसरातुन दुसऱ्या जिल्ह्यात पळुन जाण्याचे तयारीत आहेत. सदरची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार कांबळे, पोलीस अंमलदार सुतार व पोलीस अंमलदार सोगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन सापळा रचुन संशयित इसमांवर पाळत ठेऊन संशयित इसम पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी १) आकाश राजुसिंग बावरी, वय २८ वर्षे, रा. पोते वस्ती, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे २) सोनुसिंग दिपकसिंग बावरी, वय २० वर्षे रा. सदर ३) जोगिंदर जग्गीसिंग बावरी, वय ३८ वर्षे, रा. सदर ४) विनयसिंग विनोदसिंग बावरी, वय २९ वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. सदर गुन्हयामध्ये नमुद आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक नंदकुमार केकाण हे करत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परि- ०४ श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. विजय ठाकर, यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे, सहप्रभारी श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार शिंदे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड व निलख यांनी केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page