नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर..!

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीच्या (Nepal Social Media Ban) निमित्ताने युवक रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी थेट संसद पेटवली, न्यायालयाला आग लावली. गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात या युवकांनी हिंसक भूमिका (Nepal Protest) घेतली. नेपाळमधील आंदोलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला. केपी शर्मा ओली यांनी राजीनामा (KP Sharma Oli Resigns) दिल्यानंतर आता बालेन शाह (Balendra Shah) यांच्याकडे नव्या सरकारचे नेतृत्व जाणार आहे.
नेपाळच्या युवकांनी आंदोलन (Nepal Genz Protest) करत थेट मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल केला. त्यामुळे मंत्र्यांनी देश सोडून जाण्याचा मार्ग पत्करला. आंदोलकांनी बालेन शाह यांना पंतप्रधान करा अशी भूमिका घेतल्यानंतर लष्कर प्रमुख आणि बालेन शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. बालेन शाह आता नेपाळच्या अंतरिम सरकारचे प्रमुख असतील यावर शिक्कामोर्बत झालं आहे.
गेल्या काही वर्षांपासून नेपाळच्या राजकारणामध्ये चीनने मोठा हस्तक्षेप केला आहे. परिणामी त्या देशात आता आंदोलन सुरू झालं आहे. नेपाळ हा भारताचा जवळचा मित्र आहे. नेपाळच्या आंदोलनाचा परिणाम हा भारतावरही होऊ शकतो. त्याचमुळे भारतानेही नेपाळच्या सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली आहे.
Nepal New Law: सरकारचा नवा नियम कारणीभूत
नेपाळ सरकारने (Nepal Govt) एक नवीन बिल संसदेमध्ये आणलं होतं, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना (Social Media Platforms Regulation) स्थानीय प्रतिनिधी नियुक्त करणे, नोंदणी (Registration Rule), आणि जबाबदारीचे नियम ठेवणे बधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, त्या देशातील युवकांना, तरुणांच्या गटांनी त्याला विरोध केला. सरकारचा हा नियम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचं मत युवकाचं झालं आणि पुढे नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालं.
नेपाळमध्ये 26 लोकप्रिय अॅप्स जसे Facebook, Messenger, Instagram, YouTube, WhatsApp, X (पूर्वी Twitter), LinkedIn, Snapchat, Reddit, Discord, Pinterest, Signal, Threads, WeChat, Quora, Tumblr, Clubhouse, Mastodon, Rumble, VK, Line, IMO, Zalo, Soul, Hamro Patro इत्यादींवर बंदी लागू करण्यात आली आहे
नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे 26 अॅप्सवर बंदी घालण्यात आली असली तरी दुसरीकडे TikTok, Viber, Nimbuzz इत्यादी चीनी अॅप्सवर मात्र बंदी नाही. चीनच्या या कंपन्यांनी आधीच नोंदणी केली होती.
नेपाळमध्ये सध्या पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली CPN-UML आणि नेपाळी काँग्रेस सरकारने राजीनामा दिला. या सरकारवर चीनचा प्रभाव होता. त्यामुळेच देशातील तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला.
ओपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सत्तेत येणार आहे.
Nepal Protest Reasons : नेपाळमध्ये आंदोलन का पेटलं?
– गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात वातावरण निर्मिती झाली आहे.
– विरोधकांकडून सरकारच्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका.
– नेपाळी जनतेमधून याला तीव्र विरोध (strong Nepali opposition).
– फेसबुक (Facebook), इन्स्टा (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp), यू-ट्यूब (YouTube), एक्स (X) अशा सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय.
– निर्णयाने संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरली.
– ‘GEN Z’ वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी.
Who Is Balendra Shah : कोण आहेत बालेन शाह?
- नेपाळी रॅपर, संगीतकार, काठमांडूचे विद्यमान महापौर.
- नेपाळच्या राजकारणातील तरुण चेहरा.
- पहिले राजकारणी ज्यांनी ‘जेन-झी’ आंदोलनाला पाठिंबा दिला.
- एकीकडे नेत्यांची घर जळताना बालेन शाहांच्या नावाने आंदोलकांची घोषणाबाजी.
- लष्कराने ताबा घेतल्यावर बालेन शाहांकडे अंतरिम पंतप्रधान देण्यासाठी हालचाली.
- आंदोलन ‘जेन-झी’ (Gen Z protest) म्हणजेच तरुणांनी हाती घेतल्याने तरुण पंतप्रधानाची चर्चा.
- 2022 मध्ये अपक्ष लढलेले बालेन शाह काठमांडूचे महापौर झाले
- सोशल मीडिया (Social Media) आणि तरुणांच्या माध्यमातून बालेन शाहांनी (Balendra Shah) दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला.
Nepal Youth Protest : आंदोलनामागील शक्य ताकद
इतक्या मोठ्या संख्येने तरुणांनी संघटित पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणे हे सहजासहजी घडलेले नाही. यामागे एक नियोजनबद्ध ताकद, सशक्त नेतृत्व आणि संघटना असल्याचा संशय अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
नेपाळमध्ये सोशल मीडिया (Social Media) बंदीविरोधात उभ्या राहिलेल्या तरुणांच्या चळवळीने देशाच्या राजकीय भवितव्याला नवे वळण मिळू शकते. भ्रष्टाचारविरोधी मागणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आणि चीन–भारत (China India) या शेजाऱ्यांच्या भू-राजकीय स्पर्धेत अडकलेले नेपाळ हे पुढील काळात संपूर्ण दक्षिण आशियासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.




