गुगलवर नंबर शोधने पडले महागात; सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन फसवणूक

पुणे : डॉक्टरांची ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्यासाठी गुगलवर सर्च करणाऱ्याची सायबर चोरट्याने ९६ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खराडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ही घटना २१ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली आहे.
Advertisement
अपॉईंटमेंट घेण्यास गुगलवर नंबर सर्च केल्यानंतर गुगलवरील मोबाईलवर संपर्क केला. तेव्हा सायबर चोरट्याने डॉक्टर बोलत असल्याचे सांगून एक फॉर्म भरायला लावला. त्यानंतर ९६ हजार १०० रुपयांची फसवणूक केली.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर
Advertisement




