रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील आणखी एक राजकीय नेता बीजेपीच्या वाशिंग मशिनमध्ये जाण्याच्या तयारीत…..

राज्यात मोठमोठे आर्थिक कांड करून इडीची चौकशी टाळण्यासाठी राजकीय नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे सर्वश्रुत आहे. बीजेपी मध्ये गेल्यानंतर एक तर ईडीच्या चालू असणाऱ्या चौकश्या थांबतात किंवा भविष्यात लागणारे चौकश्या रद्द होतात याचा अनुभव राज्यातील जनतेने घेतलेला आहे. असाच एक रत्नागिरीतील उद्योजक व राजकीय नेता चिपळूण मधून याच ऑगस्ट महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाचे व इतर दोन पक्षाचे सरकार आहे. सरकार कोणाचेही असो दोषी असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पक्षात प्रवेश केल्यानंतर अभय देणे हे चुकीच आहे. कारण यात राजकीय नेत्यांच्या उभ्या असणाऱ्या आर्थिक साम्राज्याचा पाया हा चुकीच्या व गैरमार्गाने कमावलेल्या पैशातून उभा राहिलेला आहे का? याचा तपास होणे आवश्यक आहे. राज्यातील जनतेच्या पैशाचा चुकीच्या व गैरमार्गाने वापर करून स्वतःचे चारित्र्य स्वच्छ असल्याचे भासवून जनतेचा पैसा सामाजिक कार्यावर वापरावा व लोकांना आपण खिशातून पैसा खर्च करून राजकारण करतो असे दाखवणे हे कितपत योग्य आहे. मात्र लोकांच्या पैशाला एकीकडे संपवून व उधळून भविष्यात ज्याचा पैसा आहे त्यांना आत्महत्येची वेळ आणणे इतपत योग्य आहे? याचा विचार भाजपा सरकारने करणे आवश्यक आहे. फक्त भाजपाचे कार्यकर्ते व नेते आपल्या पक्षात घेऊन त्यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचारावर पांघरून घालणे एक दिवस भाजपा सरकारला महागात पडणार आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page