अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणा-या आरोपींना मा. पोलीस आयुक्तांचा दणका कुंटणखाना ०३ वर्षाकरीता सील..!

अवैध व बेकायदेशीर धंदे करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, यांचे “नो टॉलरन्स” या धोरणानुसार फरासखाना पोलीस ठाणे गुरनं ६८/२०२५ बीएनएस कलम १४४, ९६, ९८,९९, ३(५), ३५१(२), ११५(२),१२७(४),१३७(२),६४,४९, पोक्सो अॅक्ट कलम ४,१७ व अनैतिक मानवी वाहतुक, व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चेकलम ३,४,५,६,७ प्रमाणे दाखल गुन्हयातील अटक आरोपी नामे १. बबीता मोहम्मद शबीर शेख वय ६१ वर्ष रा. ९९४, बुधवार पेठ, पुणे (मॅनेजर) २. चंपा ऊर्फ विष्णुमाया दिनेश लामा वय वर्ष ५१ वर्ष रा. फ्लॅट नं १८/ए, नवीन बिल्डींग, तीसरा मजला, ९९४, बुधवार पेठ, पुणे मुळगाव झेब्रांग, वॉर्ड नं ०३, जिल्हा नवकोट, नेपाळ (कुंटणखाना चालक) यांनी बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्यव्यवसाय करून घेतल्याने, त्यांचे व्यवसायाचे ठिकाण सील करणेबाबत कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.
सदर कुंटणखाना असलेले ठिकाण सि.स.नं. ९९४, बुधवार पेठ, नवीन बिल्डींग, तीसरा मजला, फ्लॅट नं १८/ए, पुणे-४११००२ हा कुंटणखाना सील करणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे श्री. प्रशांत भस्मे, यांनी अनैतिक व्यापर (प्रतिबंध) अधिनियम-१९५६ चे कलम १८ (१) (अ) अन्वये मा. तत्कालीन पोलीस उप आयुक्त, परि.१, पुणे शहर श्री. संदिपसिंह गिल्ल, व मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, यांचे मार्फतीने मा. पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, यांना प्रस्ताव सादर केलेला होता. सदर बाबत मा. पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, यांनी सदर प्रकरणाची सुनावणी करून अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम १८ (१) (अ) अन्वये सदर कुंटणखान्यामधून आरोपींना निष्कासीत करून तो ०३ वर्षांकरीता सील बंद करणेबाबत आदेश पारित करण्यात आलेले होते. दिले आदेशाप्रमाणे दिनांक २८/०७/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, फरासखाना पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी सदरचा कुंटणखाना दोन पंचासमक्ष सीलबंद केलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.तत्कालीन पोलीस उप आयुक्त परि.१, पुणे शहर, श्री. संदिप सिंह गिल्ल, मा. पोलीस उप आयुक्त, परि.१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, व मा. सहा. पोलीस आयुक्त, फराखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे, पुणे शहर, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री. उत्तम नामवाडे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. अजित जाधव, फरासखाना पोलीस ठाणे, पुणे शहर, सहा. पोलीस निरी. वैशव गायकवाड, पोउनि अरविंद शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार अजय खराडे, पोलीस अंमलदार पुंडलिक जुंबड, म. पोलीस अंमलदार सुवर्णा मोरे व दिव्या जाधव यांचे पथकाने केलेली आहे.




