वडगाव शेरी भागातील 5 दुकानांना आग; दुकानातील साहित्य जळून खाक

पुणे : वडगाव शेरी बाजारपेठेत शनिवारी दुपारी पाच दुकानांना आग लागली होती. आगीत किराणा माल, तसेच खाद्य पदार्थ विक्री दुकाने जळाली. आगीत दुकानातील साहित्य भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
वडगाव शेरीतील मतेनगरमध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास एका दुकानातून धूर येत असल्याचे दिसून आले. घाबरलेल्या नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. तर आगीमुळे गोंधळ देखील उडाला होता. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत मात्र, आगीने शेजारील इतर चार दुकानांना देखील आगीच्या विळख्यात ओडले होते. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला होता.
अग्निशमन अधिकारी रमेश गांगड व प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन काही वेळातच आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या आगीचे कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




