शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर’ येथे विविध कामांचे लोकार्पण व उदघाटन..!

‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर’ येथे विविध कामांचे लोकार्पण व उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर’ येथे विविध कामांचे लोकार्पण व उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक सोयी-सुविधा व व्यवस्थांचा अभाव असल्याने शिक्षण व रुग्णसेवेच्या दृष्टीने सेवा-सुविधांचे स्टेट ऑफ द आर्ट पद्धतीने अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राज्य शासनाद्वारे ₹1000 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या नसतील तर आजच्या स्पर्धात्मक युगात खासगी वैद्यकीय महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या तुलनेत शासकीय महाविद्यालये मागे राहू शकतात. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळणारे एक्सपोजर अन्य कुठेही मिळत नाही. पण पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले तर महाविद्यालयाचा दर्जा कमी होतो. या पार्श्वभूमीवर ऑडिटोरियम, स्कायवॉक, स्पोर्टस फॅसिलिटी, कॅथ लॅब, रोबोटिक सर्जरी युनिट अशा सोयी-सुविधा उभारण्यात आल्या व आणखीही बांधकामे सुरु आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी वर्षभरात येथील सर्व कामे हातावेगळी झाली पाहिजे व वैद्यकीय महाविद्यालय लोकांच्या सेवेत आले पाहिजे. येथे सिकलसेल व थॅलेसेमिया प्रकल्प, बोनमॅरो ट्रान्सप्लांटसंदर्भातील व्यवस्था उभारण्याबाबात निर्णय घेऊ. दंतवैद्य महाविद्यालयाचे काम सुरु आहे, ते वेगाने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. प्रविण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. कृपाल तुमाने, आ. संदिप जोशी, आ. अभिजित वंजारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page