दिंडी सोहळयात हरवलेल्या महिलेस सुखरुप दिले दिंडीप्रमुख यांच्या ताब्यात..!

दि.२०/०६/२०२५ रोजी दिंडी सोहळयाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे श्रीमती मनिषा पाटील, या अधिनस्त अंमलदार यांचेसह पेट्रोलिंग करत असताना एक महिला घाबरलेल्या स्थितीत दिसुन आल्या. तेव्हा त्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्या दिंडीमध्ये आल्या असुन त्या चुकल्या आहेत. तेव्हा श्रीमती मनिषा पाटील, वपोनि, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारणा करता त्यांनी सीता दत्तात्रय ठाकूर वय ५५ वर्षे रा. दसखार, भटआळी असे सांगितले. परंतु त्यांचेकडे कोणाचाही मोबाईल नंबर नसल्याने व त्यांना सविस्तर माहिती देता येत नसल्याने शोध घेणे कठीण होत.

Advertisement

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांनी अधिनस्त अंमलदार यांना उरण पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे सांगितले. उरण पोलीस स्टेशन व्दारे सदर बाबत माहिती घेतली असता सदर महिलेच्या पतीचा व दिंडीमालक यांचा मोबाईल नंबर प्राप्त झाला. मोबाईल नंबर प्राप्त होताच मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन सदर बाबत दिंडी मालक यांना माहिती दिली. काही वेळाने दिंडी मालक व इतर दोन इसम मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांचेकडे खात्री करुन महिला नामे सीता दत्तात्रय ठाकूर वय ५५ वर्षे रा. दसखार, भटआळी यांना त्यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page