सायबर चोरट्यांकडून ५८ लाखांची फसवणूक..!

सायबर चोरट्यांकडून ५८ लाखांची फसवणूक
पुणे,. सायबर चोरट्यांनी पुन्हा वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची ५८ लाख रुपयांची फसवणूक केली. काही केल्या पोलिसांना या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही तर नागरिक चोरट्यांच्या आमिषाला बळी पडतच आहेत. वारजेतील एका नागरिकाची शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने २१ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख तपास करत आहेत. दूरसंचार विभागाकडून मोबाइल सेवा बंद करण्यात येणार असल्याची बतावणी करुन येरवडा भागातील महिलेची ३३ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करत आहेत. सायबर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने वाघोलीतील एका महिलेची पाच लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला पैसे मिळतील, असे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.याबाबत महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक पंडीत रेजितवाड तपास करत आहेत. कारवाईची भीती दाखवून एका तरुणीची चोरट्यांनी १ लाख रुपयांची फसणूक केली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक काळंगे तपास करत आहेत.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




