नामांकित पक्षाचे प्रमुख यांचे कारवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद..!

दि.१९/०५/२०२५ रोजी रात्री नामांकित पक्षाचे प्रमुख यांचे गणपती माथा, वारजे येथील परिसरातील कार्यालयासमोर लावलेल्या कारवर गोळीबाराची घटना घडलेली होती. सदर अनुषंगाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २१३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ३(२७), क्रिमीनल लॉ अर्मेन्डमेंट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याची दोन पथके व गुन्हे शाखेचे युनिट ३ व दरोडा प्रतिबंधक पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्याचे प्रकटीकरणासाठी प्रयत्नात होते. वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सुमारे १५० ते २०० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे पडताळून तसेच गोपनीय माहितीदार तयार करुन त्या अनुषंगाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. माहितीचे विश्लेषन करुन तपास करत असताना पोलीस अधिकारी संजय नरळे, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार अजय उर्फ बगली रविंद्र सपकाळ व त्याचा साथीदार यांनी मोटार सायकलवरुन येवुन गणपती माथा येथे फायरिंग केली असुन त्यांना शुभम संपत खेमणार व सचीन अनिल गोळे यांनी मदत केल्याचे माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीवरुन आरोपी वारजे माळवाडी पोलीसांच्या तपास पथकाने केलेल्या तपासात १) अजय उर्फ बगली रविंद्र सपकाळ, वय २५ वर्षे, रा. मनपा शाळेसमोर, रामनगर, वारजे, पुणे व त्याचा साथीदार येवुन यांनी गणपती माथा येथे फायरिंग केली आहे. २) शुभम संपत खेमणार, वय-२७ वर्षे, रा. रुणवाल पॅनोरमा, बिल्डींग नं. ३, फ्लॅट नं. ७, वारजे माळवाडी, पुणे याने अजय सपकाळ व त्यांचा साथीदार यांना सदरचा गुन्हा करण्याकरीता थारगाडी मधुन डोणजे, कोल्हेवाडी येथुन घेवुन प्रायेजा सिटी रोडवरील रघुनंदन हॉल जवळ आणुन सोडले. तसेच ३) सचीन अनिल गोळे, वय २७ वर्षे, रा. रुणवाल मिडॉज, बिल्डींग नं.१३, फ्लॅट नं.२१, वारजे माळवाडी, पुणे याने सदरचा गुन्हा करण्याकरीता दुचाकी घेवुन येवुन ती त्यांचे ताब्यात दिली. त्यानंतर अजय सपकाळ व त्याचा साथीदार यांनी त्या दुचाकीवरुन जावुन गणपती माथा येथे नामांकित पक्षाचे प्रमुख यांचे कारवर फायरिंग केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी क्र.१ ते ३ यांना दिनांक २५/०५/२०२५ रोजी अटक केली असून त्यांना मा. न्यायालयाने दिनांक २९/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे श्री.अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन श्री. विश्वजीत काईंगडे, पोलीस उप निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजीव कळंबे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page