खंडणी मागणाऱ्या इसमास पोलिसांनी केले जेरबंद..!

आदरणीय सर,
दिनांक 28/3/2025 रोजी दुपारी तक्रारदार गौरव प्रमोद दुगड ,वय 35, व्यवसाय-कन्स्ट्रक्शन रा.वसंत बाग सोसायटी बिबवेवाडी यांनी पोलीस ठाणे येथे समक्ष येऊन त्यांच्याकडे असलेला ड्रायव्हर याने त्यांचे वडील हे जवळीक साधत असल्याचे व्हाट्सअपवर मेसेज दाखवून, जर तुम्हाला तुमची बदनामी थांबवायची असेल, तर त्या बदल्यात 10 लाख रुपयाची खंडणी द्यावी लागेल, ती न दिल्यास, त्यांना व कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देऊन सगळीकडे हे मेसेज प्रसारित करेल, अशी धमकी देऊन खंडणी मागत असल्याचे आशयाची तक्रार दिली.
सदर तक्रारी बाबत शहानिशा करून तक्रारीत तथ्य आढळले. तसेच दरम्यानच्या काळात खंडणीखोराचे तक्रारदार यांना मेसेज आले. त्यामध्ये खंडणीखोराने खंडणीची रक्कम पुष्प मंगल कार्यालय येथे घेऊन येण्यास सांगितले .
त्यानुसार सापळा कारवाई सुरू केली. आरोपीस दोन लाखाच्या डमी नोटा व नऊ हजार पाचशे रुपये चलनी नोटा अशी एकूण 2,09,500/– रुपयाची खंडणी स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपीचे नाव अमित दत्तात्रय थोपटे रा. गुरुदत्त अपार्टमेंट बालाजी नगर पुणे असे असून, त्याचे विरुद्ध बिबेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 68/2025 BNS.308 (5) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून आज रोजी मा . न्यायालयासमोर रिमांड रिपोर्टसह हजर केले असता त्यास दिनांक 31 /3 /2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेले आहे.
आदरपूर्वक सादर,
शंकर साळुंखे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर




