चोरटयाकडुन २ रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी..!

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतुन रिक्षा व दुचाकी गाड्या चोरी करुन त्या कात्रज कोंढवा रोडवरील पेरुची बाग येथे लावुन ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोड, पेरुची बाग येथे जावुन पाहता तेथे आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा मिळुन आला असुन त्याचेकडुन २ तीन चाकी रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त केली असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५१/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २५०/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)
३. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३०६/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन सरपाले, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.




